अपघात खूप काही शिकवतो...
२०१२ ची गोष्ट आहे . नुकताच संगणक, इंटरनेट , ब्लॉग अशा गोष्टींशी परिचय झालेला.
वाटले नवे पर्व सुरु झाले. पण झाले असे अनपेक्षित की थेट १० वर्षे या सर्व गोष्टींना मुकावे लागले.
करोना आला आणि राहिले होते नव्हते ते सर्व करून गेला.
एक प्रकारची सुटकाच म्हणावी लागेल.
डोक्यावरचे ओझे वाहताना उदरनिर्वाह चुकला नव्हता. पोटपाणी सांभाळून प्रपंच करताना वाचनात मन रमवणे यापेक्षा दुसरे काम नव्हते.
वाचनाने एक झाले. मी खरोखर भ्रमिष्ट असल्याची खात्री पटली.
जगाची गणिते आणि माणुसकी जपणाऱ्यांची गणिते पूर्ण वेगळी असतात हे लक्षात आले.
प्रचंड उलथापालथीचा मोठा १० वर्षांचा काळ देखील माणुसकी जपणाऱ्यांची संख्या कमी असली तरी, ती नगण्य नक्कीच नाहीये, याची सुखद जाणीव करून देणारा होता.
याच भरवशावर माझ्याकडची वाचून झालेली जुनी पुस्तके वाचनप्रेमी वाचकांना विकत देण्याचा विचार आहे.
शारीरिक मर्यादा आल्यामुळे कामे कमी करता येतात हे खरे असले तरीही पोटपाणी आणि घर चालवण्यासाठी काहीतरी उद्योग करणे भाग आहेच.
ज्या मित्रानी माझ्यावरच्या निर्व्याज प्रेमापोटी शेकडो पुस्तके भेट दिली आणि माझे आजारपण सुसह्य केले त्या मित्राच्या ऋणातून मी कदापि मुक्त होऊ शकणार नाही. त्यात भर म्हणजे ही सर्व पुस्तके ज्याची त्याच मित्राने हीं पुस्तके विकून आर्थिक अडचण कमी करता येईल हेही सुचवले. आज त्या मित्राची आर्थिक अवस्था खराब आहे हे मला माहिती आहे. तरीही ही परवानगी देणे म्हणजे खरे तर स्वतः:च्या पोटाला चिमटा काढून दुसर्याचे पोट भरण्याचा उद्योग. पण माझी अवस्था त्याला जेवढी माहिती आहे तेवढी इतर कोणालाही माहिती नाही. दोघे अडचणीत. पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन.
लवकरच मी पुस्तकांच्या विक्रीसाठी एक वेगळा ब्लॉग सुरु करेन. त्याला यश किती मिळेल माहिती नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?