पुण्यातील एका जुन्या मंदीरामुळे आलेला हा मागच्या महिन्यांतील अनुभव
महादेवाच्या त्या शांत मंदिरात माझे पाय कसे लागले माहिती नाही. कारण आलेल्या अनुभवांतून आयुष्यावरच्या विश्वासाचे पानिपत कधीच झाले होते. त्यातून मंदीरात मी सहज आलो होतो. खरे तर एका वृद्ध बाईच्या मागे आलो होतो. होय कशाला स्वतःची फसवणूक करायची? वडीलांनी दिलेली काही पुस्तके त्यांच्या एका स्नेह्याकडे नेऊन द्यायची होती. ती दिली व मी मोकळ्या वेळेची संधी साधून एका टपरीवर सिगारेटचे कश मारत उभा होतो. सिगारेट ओढता ओढताच मनात आले - लग्नापूर्वी कधी सिगारेट, दारुला हातही लावला नव्हता आणि आता दिवसाला एकेक पाकीट लागत होतं. असो. तर एकेक कशचा आस्वाद घेताना अचानक मला ती वृद्धा दिसली. मंदीर जवळच होते. पण ती बाई खूप अडखळत आणि तोल सावरत चालत होती. मला राहवले नाही. मी लगेच सिगारेट टाचेखाली चुरगाळली व त्या बाईकडे गेलो. तिचा हात धरुन मी तिला मंदीरात नेले. तोवर दर्यार्द्र डोळ्यांनी ती माझ्याकडे बघत होती. त्या बाईंना पायर्या चढवून मी महादेवाच्या मंदीरापुढे उभे केले. बाईंना मी म्हणालो -
" आजी तुम्ही दर्शन घेऊन या, मी इथे बसलो आहे."
जणू सगळे कळाल्यासारखी ती वृद्धा मान डोलावत गाभार्यात गेली आणि काय काय स्तोत्रे म्हणू लागली.
मी तिथल्या एका बाकड्यावर बसून इकडे तिकडे बघत बसलो. पिंपळाच्या झाडावर एक पोपट एका फांदीवर बसून कुठुनसे आणलेले अंजीर खाण्याचा प्रयत्न करत होता, पण सारखे ते अंजिर त्या पोपटाच्या पकडीमुळेच डोलायचे आणि मग पोपट इकडे तिकडे बघत खायचा प्रयत्न करत होते. तिथून नजर हटवली ती समोरच्या भजनी मंडळाकडे
एकसुरात तल्लीन होऊन ही मंडळी भजने म्हणत होती. तिथे काही दर्शनासाठी आलेले भक्तही बसून सुरात सूर मिळवून तल्लीन होण्याचा प्रयत्न करित होते. माझे मन लागणे शक्य नव्हतेच आणि तसेही त्या वृद्ध भजनी मंडळींकडे बघण्यासारखेही काही नव्हते. नाही म्हणायला एक साधारणशी दिसणारी मुलगी समोरच्या बाकड्यावरुन फुलांची माळ ओवता ओवता माझ्याकडे तिरपे कटाक्ष टाकीत होती. तिकडे चित्त लागणे तर कालत्रयीही शक्य नव्हते. मग एका भक्ताकडे नजर गेली. नंदीच्या कानापाशी तो पाचेक मिनिटे बोलत होता. मला हसूच येत होते. पण सार्वजनिक ठिकाणी भान ठेवावे लागते तद्वतच मी हसू दाबून त्याचे निरिक्षण करु लागलो.
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक कृश हात पडला अन् मी दचकलो.
बघतो तर ती वृद्धा होती. म्हणाली - 'बाळा! देव तुला सुखी करो, आज माझा भोळा शंकर तुझ्या रुपाने माझ्या मदतीला धावून आला.'
बोलता बोलताच ती वृद्धा माझ्या शेजारी बाकावर बसली होती.
मला मी जे काही केले त्यात वेगळे काहीच वाटले नव्हते. मी काही बोलायच्या आतच ती वृद्धा परत म्हणाली -
"गेले सहा दिवस मी मंदीराचे दर्शन घेण्यासाठी येत होते रे. पण देवळाचा हा मोठा उंबरठा माझ्या एकटीच्याने ओलांडायला काही जमत नव्हते. गल्लीतले खूप जण देवळात माझ्यासमोर जायचे रे. पण कोणी कोणी मदत केली नाही." असे म्हणून ती स्फुंदू लागली.
मी म्हणालो - "आज्जीबाई, तुम्ही रडताय कशाला? मनासारखे दर्शन झाले ना? ते दर्शन गोड मानून घ्या . चला मी सोडतो तुम्हाला घरी"
आम्ही निघालो - मंदीराच्या जवळच ५ मिनिटांच्या अंतरावर घर होते त्या आजीबाईंचे
"आज्जी म्हणाली एक मिनिट आत तर ये ना?"
मी संकोचलो. तशी ती म्हणाली - " अरे देवाचा प्रसाद द्यायचाय तो असा उंबरठ्यावर किंवा घराबाहेर देतात का? पण तुला चालेल ना?"
मी म्हणालो - "हे काय आज्जी? देव सर्वांसाठी सारखाच असतो ना? मग काय तर?"
मी थोडा आत आलो.थोडी प्रशस्त पण एकच खोली होती. एका खाटेवर एक तरुण स्त्री पडलेली होती. ती आज्जी म्हणाली - "ही माझी सून. हीच्यासाठीच साकडे घालायला माझ्या शंकराकडे गेले होते. पोरगा मरुन चार वर्षे झाली. आणि हिला शुद्ध आहे पण जगण्याचा मोह संपलाय. भरवले तर माझ्याच हातून खाते. खूप प्रेम होतं हिचं माझ्या लेकरावर."
मी थोडा हादरलोच होतो. आठ वर्षे नवर्याच्या विरहात जळालेली आजच्या जमान्यातली ही सावित्री कुठे आणि आजच्या काळात क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट घेणारे कुठे?"
मी आज्जींना म्हणालो - "तुम्ही परवानगी देत असाल तर एक मिनिट बोलू का यांच्याशी?"
"बोल बाबा तू पण सांगून बघ." म्हणून ती उंबर्यावर जाऊन उभी राहिली
पडल्या पडल्याच अशक्त आवाजात ती तरुण स्त्री मला बोलली - "आईंचे बोलणे मनावर घेऊ नका. जा तुम्ही"
मी म्हणालो - "मी तुम्हाला काहीच समजावणार नाहीये. फक्त एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या आणि मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्ही विरहात असे स्वतःला त्रास करुन घेत आहात, तुमच्यावर जिवापाड प्रेम करणार्या तुमच्या पतीला तुम्ही असे राहिलेले बघवले असते का?"
एक सेकंद तिचे डोळे आक्रसले गेले. कंठ अवरुद्ध झाला.
"पतीसाठी आणि तुमच्या आईंसाठी काळजी घ्या स्वतःची"
असे म्हणून मी निघालो.
माझ्या डोक्यातून तो विषय निघूनही गेला होता. पण आमच्या वडीलांनी दिलेली पुस्तके आणायचे काम परत आमच्याकडे दिले. तेव्हा गेलो तर आजीबाई बाहेरच तांदूळ निवडत होत्या.
माझ्याकडे लक्ष जाताच त्या एकदम आनंदीत झाल्या व मला घरात या म्हणून खुणेनेच बोलवून आत गेली.
मी आत जाताच एक टवटवीत चेहर्याची सुंदर स्त्री हसून माझे स्वागत करत होती.
"होय मीच ती" असे म्हणताच मला धक्काच बसला. एवढी अशक्त व कृश असणारी स्त्री एवढी टवटवीत आणि निर्मळ हास्यामुळे अगदी वेगळी वाटत होती.
आज्जीबाई म्हणाल्या - "मुला तू काय जादू केली माहिती नाही, पण त्या दिवसापासनं हिने नीट खाणं-पिणं सुरु केलं. माझ्या भोळ्या शंकराने माझे खरेच ऐकले. "
पुढचे काही सांगण्यासारखे नाही.
मी विचार करतच त्या घरातून बाहेर पडलो - "खरे मंदीर नक्की कुठे आहे? या घरात की त्या मंदीरात?
आणि हो अजून एक - त्या आज्जीबाईंच्या अंगावर कोड होते.

aapan suru kelele NIVDAK ha Blog pahila. Maze teen lekh ghetlyabaddal THANKS. Aapla parichya kalu shakel ka?
ReplyDeletedhanyaavad. aaple lekhan chngle hote mhnun add kele. Kshama kara vyktigat kaarnastav online navto
ReplyDelete